सालेकसा/गोंदिया :- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारताची अखंडता आणि एकता अबाधित राहो या संकल्पनेखाली रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन बेस कॅम्प मुरकुटडोह जिल्हा गोंदिया, राज्य राखिव पोलिस बल गट क्र 13 वडसा , C/60 कमांडो,Mp पोलिस कमांडो, CG कमांडो यांच्या संयुक्त विद्यमानाने बेस कॅम्प मुरकुटडोह येथे करण्यात आले.
मा.अभय डोंगरे,अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली मा.चेतन ढेकने API मुरकुडोह, मा.लोमेश अंबादे पोलिस उपनिरीक्षक वडसा, दिनेश मेजर MP Howk फोर्स, यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे सुरुवात सकाळी 07.00 वाजता बेस कॅम्प मुरकुटडोह चे समोर मुरकुटडोह 03 येथे सुरुवात झाली. आणि सकाळी 08.00 वाजता शांततेत समारोप झाले. रन फॉर युनिटी मध्ये मुरकुटडोह 1.2.3,दंडारी, टेकाटोला चे विद्यार्थी – विद्यार्थिनी,तसेच पुरुष वर्ग तसेच , मुरकुटडोह बेस कॅम्प अंमलदार व पोलिस अधिकारी अशा मिळून सुमारे 150 ते 200 गावातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मार्ग – बेस कॅम्प मुरकुटडोह 03 पासून तिन कि.मी.समोर वयोगटाप्रमाणे रन फॉर युनिटी चे कार्यक्रम घेण्यात आले.व मा. अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे हस्ते विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. नक्षलग्रस्त भागात विद्यार्थी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सहभागी विद्यार्थ्यांचा सुद्धा माननीय अभय डोंगरे साहेबांनी कौतुक केले .

कार्यक्रमाला उपस्थित गावचे पोलिस पाटिल, तसेच विद्यार्थी – विद्यार्थिनी गावतील मान्यवर उपस्थित होते. त्यांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. लहान मुलांना मा.अभय डोंगरे साहेब यांचे हस्ते बिस्किटे, पाणी बाटल वाटप करण्यात आले.
मा.चेतन ढेकने Api मुरकुटडोह यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना, तरुणांना मार्गदर्शन केले.
