निबंध,चित्रकला स्पर्धा आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन.
नवेगावबांध दि.७.:- सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने शाळेत निबंध,चित्रकला स्पर्धा आणि वृक्षारोपणाचे आयोजन आज दि.७ ऑक्टोंबर रोज मंगळवारला सकाळी११.३० वाजता करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण संरक्षण व संवर्धन या विषयावर जनजागृतीने झाली.त्यानंतर ‘वन्यजीव व मानव सहजीवन’ आणि ‘वन्यजीव व त्यांचे अधिवास’ या विषयांवर चित्रकला,निबंध स्पर्धा पार पडली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस.टेंभुर्णे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अर्जुनी मोरगावचे वनपाल संतोष घुगे उपस्थित होते.विशेष अतिथी म्हणून लागवड अधिकारी कु.पी. पी. बनसोड, संस्थेचे सचिव एल.आर.भैसारे यांच्यासह,बाराभाटी बीटरक्षक कु.मंगला खोब्रागडे, वनरक्षक महेंद्र चांदेवार,प्रशांत लाडे,
लता टेंभुर्णीकर,जे.एस. हटवार, एम.यु.घरोटे,वनमजूर वैभव कऱ्हाडे तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय हरित सेना प्रमुख शिक्षक एस.व्ही.बडोले यांनी प्रास्ताविकातून ‘वन्यजीव आपली गरज आहेत’ हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले.प्रादेशिक वन विभागाच्या बाराभाटी बीटरक्षक मंगला खोब्रागडे यांनी वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले,तर वनरक्षक महेंद्र चांदेवार यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची गरज यावर मार्गदर्शन केले.वनरक्षक पंकज लाडे यांनी पर्यावरण संतुलनात वन्य प्राण्यांचे स्थान यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अतिथींचे यावेळी समयोचित भाषणे झाली.
वृक्षारोपणानंतर मार्गदर्शन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक साची सूर्यवंशी, द्वितीय मोहिनी गुढेवार,तर यश नंदागवळी याने तृतीय क्रमांक पटकाविला. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक गौरव कापसे,द्वितीय रविकांत बडवाईक,तृतीय प्रतिज्ञा सयाम हिने पटकाविला.
चित्रकला, निबंध स्पर्धेतील पूर्व माध्यमिक व माध्यमिक गटातील प्रथम तीन विजेत्यांना वन विभागाकडून बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन हरित सेना प्रमुख एस.व्ही.बडोले यांनी केले,तर आभार प्रदर्शन एच.एस.पात्रीकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिचर बी.आर.पंचलवार, राकेश वालदे,गौरव चव्हाण,वन मजूर राजतिलक डुमाने,प्रकाश मेंढे,धनंजय नेवारे,दामू तवाडे,श्यामसुंदर लेंढे यांनी सहकार्य केले.
