गोंदिया:- दैनंदिन जीवनामध्ये होत असलेल्या समस्यांमध्ये शारीरिक व्याधी सुद्धा मरणाच्या घटकेपर्यंत त्रास देईल असा प्रकरण जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बिरी येथे घडला. या घटनेत मृतक ग्यानीराम तुकाराम मेश्राम वय 58 वर्षे हा कॅन्सर या रोगाने ग्रस्त असल्यामुळे त्याच्या दैनंदिन जीवनात होत असलेल्या असह्य वेदनांना कंटाळून त्याने (दि. 19 सप्टेंबर) रोजी रात्री गावातीलच तलावात पाण्यात उडी मारून आत्महत्या केली असून तो मृत्युमुखी पडला. या घटनेची दखल घेऊन पोलीस स्टेशन डुग्गीपारच्या चमूने पोलीस निरीक्षक वनारे यांच्या मार्गदर्शनात मार्ग दाखल करून कलम 194 बीएनएसएस 2023 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार घोरमारे व सहायक फौजदार निर्वाण हे करत आहेत.
