नागपूर -मौलाना अबुल कलाम आझाद ज्युनिअर कॉलेज नागपूर येथे दिनांक 14 सप्टेंबर रोजी तिसऱ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र ट्रेनिंग सेमिनार तसेच ब्लॅक बेल्ट पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, बुलढाणा शहर, वर्धा शहर, गोंदिया, गडचिरोली, जालना, पिंपरी चिंचवड पुणे, यवतमाळ, लातूर आदी जिल्ह्यातील 78 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता तथा दहा खेळाडूंनी ब्लॅक बेल्ट पदवी प्राप्त केली.
या सेमिनारमध्ये ब्लॅक बेल्ट परीक्षा घेण्यासाठी कॉन्कीडो फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे आंतरराष्ट्रीय कोच मास्टर विश्वजीत बारी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. त्यांनी आपले कौशल्य व अनुभव पणाला लावून खेळाडूंना प्रशिक्षित केले. या सेमिनारच्या आधारे आगामी युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये खेळाडूंना खेळण्यास मदत होईल तसेच राज्याचे नाव लौकिक करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील खेळाडू भारत बिसेन याने उत्कृष्ट कामगिरी करत ब्लॅक बेल्ट पदवी प्राप्त केली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पियुष आंबुलकर संघटनेचे अध्यक्ष शेख जाबीर तसेच सचिव इकबाल शेख व इतर पाहुणे प्रामुख्याने उपस्थित होते. खेळाडूच्या यशस्वी ते करिता फोर्स वन फाउंडेशन संघटनेचे पदाधिकारी अरुण कावडे, रवी रामटेककर, सेंसाई जनार्दन कुसराम आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
