ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

ठगबाजासोबत लाखोंच्या जमीन व्यवहाराचा शहाकार गृह निर्माण सहकारी संस्थेवर आरोप; चौकशीची मागणी 

हिंगणा/नागपुर: – शहाकार गृहनिर्माण सहकारी सोसायटी, नागपूर यांच्या कथित बेकायदेशीर जमीन व्यवहारांप्रकरणी नवीन बाब समोर आली आहे. उपलब्ध लेखापरीक्षण (ऑडिट) अहवालात एका कथित ठगबाज व्यक्तीसोबत सोसायटीने लाखो रुपयांचा जमीन खरेदी-विक्री व्यवहार केल्याची नोंद असल्याचा दावा तक्रारदार गजानन ढाकुलकर यांनी केला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीविरुद्ध विविध तक्रारी आणि वादग्रस्त व्यवहारांच्या नोंदी असतानाही सोसायटीने मोठी आर्थिक रक्कम स्वीकारून जमीन व्यवहार केल्याचा उल्लेख लेखापरीक्षण अहवालात आहे. त्यामुळे या व्यवहारामागील आर्थिक देवाणघेवाण, निधीचा स्रोत, व्यवहाराची वैधता आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका यांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.

याप्रकरणी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था हिंगणा यांनी तक्रारीची दखल घेत प्रकरण जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांच्याकडे पुढील चौकशीसाठी पाठविले आहे. चौकशीत जमीन व्यवहार, सभासदांकडून स्वीकारलेली रक्कम, लेखापरीक्षण अहवालातील निरीक्षणे आणि संबंधित व्यक्तींसोबतचे आर्थिक व्यवहार यांची तपासणी होण्याची शक्यता आहे.

तक्रारीतील आरोपांची सत्यता चौकशीअंती स्पष्ट होणार असली तरी या प्रकरणामुळे संबंधित सभासद आणि भुखंड खरेदी दारा मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment