ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

जनसेवेचा वारसा जपणारे विजयभाऊ फुंडे; शहरवासीयांचे प्रभावी नेतृत्व.. लोककल्याणाची कास धरणारे जनसेवक.!

राजू फुंडे, प्रतिनिधी – सालेकसा :-  शहरातील जनसेवा, विकासकामे आणि लोकहिताची परंपरा जपणारे स्वर्गीय सुदामभाऊ फुंडे यांचे योगदान आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. स्व. सुदामभाऊ फुंडे हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी सन 1982 पासून सलग 15 वर्षे ग्रामपंचायत आमगावखुर्द चे सरपंच म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.

त्यांच्या सरपंचपदाच्या काळात सन 1992 मध्ये जनजाती नेते गुंडाधूर शासकीय (आदिवासी) औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), सालेकसा यांची स्थापना झाली. त्यावेळी संस्थेचे पहिले प्राचार्य एम. डी. वानखेडे होते. तसेच गावात नळ पाणीपुरवठा योजना राबवून प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवनमानात मोठी सुधारणा झाली.

स्व. सुदामभाऊ फुंडे यांच्या सामाजिक व विकासात्मक कार्याचा वारसा त्यांचे सुपुत्र विजयभाऊ फुंडे पुढे नेत आहेत. नगर पंचायत सालेकसा निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झाला आणि 13 जानेवारी 2026 रोजी झालेल्या पहिल्या सभेनंतर विजयभाऊ फुंडे यांनी नगर पंचायत अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.

अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी शहराच्या मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष दिले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पाणी टँकर, गटर सफाई मशीन (वाहन) उपलब्ध करून देण्यात आले. तसेच नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी व विरंगुळ्यासाठी “नमो गार्डन” उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.

याशिवाय शहरातील नाल्या, रस्ते, स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाच्या कामांना गती देत सालेकसा अधिक सुंदर आणि विकसित करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे सालेकसा नगरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून अनेकजण त्यांच्या कार्याचे कौतुक करीत आहेत.

सालेकसाच्या विकासासाठी स्व. सुदामभाऊ फुंडे यांनी घातलेला पाया आणि विजयभाऊ फुंडे यांचे सुरू असलेले विकासकार्य हे जनतेसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Comment