गोदिया :– ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी लोककल्याणकारी कामे करण्याच्या उद्देशाने विविध फंडातून रस्ते इमारत बांधकाम केले जातात त्यामागील उद्देश एकच की ग्रामीण जनतेला रहदारीसाठी तसेच सार्वजनिक ठिकाणी सभेच्या निमित्ताने सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने सदर बांधकाम केले जातात. मात्र या बांधकामांमध्ये कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाच्या निधीचा सर्रास गैरव्यवहार होत असताना दिसतोय. सदर घटना तालुक्यातील खळबन्दा आहे गावातील असून तेथे विविध निधीच्या माध्यमातून समाज भवन, सांस्कृतिक भवन, सिमेंट रस्ता, ग्रामपंचायत निर्माण आदी अनेक कामे करण्यात आली आहेत. मात्र या कामांच्या दर्जा व गुणवत्तेवर स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. यापैकी एकही काम परिपूर्ण करण्यात आलेला नाही तसेच त्या कामाची माहिती देणारे सूचनाफलक देखील लावण्यात आलेले नाही त्यामुळे सदर बांधकाम कोणत्या फंडातून व किती निधीचा आहे तसेच त्याची सुरुवातीची तारीख व काम पूर्ण होण्याची तारीख याचा उल्लेख कुठेही नाही. तसेच त्याच्या देखभाल दुरुस्तीची काळजी कोण घेणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही त्यामुळे शासनाचे करोडो रुपये खर्च होऊन देखील कार्य करणारी यंत्रणा ही जनतेला अंधारात ठेवत असेल तर त्याचे उपयोग तरी काय असा प्रश्न तेथील जनता करू लागली आहे.
गावातील विकास कामे करण्यासाठी ग्रामपंचायत प्राथमिकतेने पुढाकार घेते मात्र यंत्रणेचे पदाधिकारी सरपंच, सचिव ग्रामविकासाचे नावे स्वतःचेच विकास करण्यात व्यस्त आहेत. त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडून टक्केवारीच्या नादात डोळे मिटून बिलांवर सह्या करतात अशा चर्चा परिसरात जोर धरू लागले आहेत. या सर्वांवर नियंत्रण ठेवणारी पंचायत समिती स्तरावरील विस्तार अधिकारी यांची तीक्ष्ण नजर राहते मात्र त्या नजरेला सुद्धा मोठ्या भिंगाचा चष्मा लावावा लागणार की काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. याविषयी शासन भौतिक सुख सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी करोडो रुपयांचा निधी ग्रामपंचायततिला पाठवतो मात्र वर्षाअखेरीस आलेल्या निधीची विल्हेवाट लावण्यात आली व त्यातील अनेक कामे ही कागदपत्रे पूर्ण करून नसतीबद्ध केल्या जातात व पुन्हा नवीन वर्षाच्या कामासाठी तगादा लावला जातो. अशा प्रकारे शासनाच्या अनेक योजना ह्या कागदावरच राबवल्या जातात व तेथील ग्रामीण नागरिक हा वर्षानुवर्षे विकासाची वाट पाहत राहतो..

नजीकच्या ग्रामपंचायतीत एका जागृत युवकाने आपल्या ग्रामपंचायतीची पोल खोलली आहे त्यामुळे परिसरात वातावरण अगदी तापलेला आहे. या निमित्ताने शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. याविषयी प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
