लाखांदूर / भंडारा :- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमाडी/ दहेगाव येथील कु. ओजल सुधीर खोब्रागडे हिने नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा सन २०२५-२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. तिची नवोदय विद्यालया साठी निवड झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
नवोदय विद्यालयाची परीक्षा ही अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक मानली जाते. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते. कु. ओजल ने नियमित अभ्यास, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर या परीक्षेत यश मिळवून आपल्या कुटुंबाचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
तिच्या या यशाबद्दल शिक्षक, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ओजल च्या या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही जिद्दीने अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
भविष्यात उच्च पदस्थ अधिकारी होऊन समाजाची सेवा करण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल परिसरातून तिचे विषेश कौतुक व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.
