मर्दाच्या तमाशातुनच खरे सामाजिक प्रबोधन घडते – गोपाल बोरकर यांचे प्रतिपादन 

अर्जुनी मोरगाव : –    भारतीय लोककला जीवंत ठेवण्यासाठी नागरिकांनी लोककला जपणे आवश्यक आहे. माणूस कलेचा कलाकार म्हणून सामाजिक प्रबोधन करतो. अशातच तमाशा हा फार प्राचीन काळापासून प्रबोधनाचा वसा जपतो आहे. म्हणून मर्दाच्या तमाशातुनच खरे सामाजिक प्रबोधन घडते. असे प्रतिपादन गोपाल बोरकर यांनी केले. ते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. 

यावेळी मंचावर सेवानिवृत्त तहसीलदार मुनेश्वर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, चंद्रशेखर ठवरे, आनंद चंद्रीकापुरे, रवी रणदिवे, प्रशांत मेश्राम, सुशील रामटेके, भवेश तागडे, विश्लेष मेश्राम, गौतम रामटेके, सुरेश खोब्रागडे, दिपक कुंभरे, निशिकांत तागडे, विकास चवरे, नंदेश्वर रामटेके, देवला कोवे, मंगला नैताम, श्रिमती रंगारी, जयकांत गेडाम, भुपाल गेडाम, उमेश बोरकर, मयुर खोब्रागडे, बुद्धरत्न रामटेके, विवेक रामटेके, उमेश मेश्राम, आदी मंचावर उपस्थित होते. 

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा या महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गोपाल बोरकर यांचा मंडळाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी मंचावरील अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन संगम नंदागवळी यांनी करून आभार कमलेश ब्राम्हणकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास ईस्कापे, विशाल गेडाम, दिपक तागडे, रोहित रामटेके, हनवत तागडे, दिनेश नंदागवळी, संदीप नंदागवळी, संदीप पंधरे देवेंद्र बोरकर प्रकाश शेंडे, नरेंद्र गणवीर अजिंक्य लोणारे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment