विद्यार्थ्यांनी आपली दिशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी ठरवावी : पंकज तागडे

गोंदिया :

या जगातील अतिशय महत्त्वाचे विद्यार्थी फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांची जगात किमया तशी उमटली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी विश्वातील घटकांचा विचार करून सर्व समाजाचे उद्धार होईल यासाठी उत्तम प्रयत्न केला. परिस्थिती सुधारली समाजाला मोठे केले. असा जगाचा उद्धारक कोणीच नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी आपली दिशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी ठरवावी. असे प्रतिपादन के. की. एस. जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथील समाजसेवा अधिक्षक पंकज तागडे यांनी केले. ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

यावेळी मंचावर शाळेतील शिक्षक मुन्नाभाई नंदागवळी यांच्या अध्यक्षतेखाली प्रदीप ढवळे, पी ए लांजेवार, आशिष शहारे, कार्तिक शहारे, दीक्षा तुरकर व तुषार महाजन आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर कार्यक्रम अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, नंगपुरामुर्री येथे पार पडला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना नंदागवळी म्हणाले- वर्ग दहावीतील विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. कोणताही काम करायला अभ्यास करावेच लागते. भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर अभ्यासाशिवाय दुसरा मार्ग नाही. दिवसेंदिवस बोर्डाच्या परिक्षा ह्यांची नियमावली वाढत जाते. तसेच आरोग्य, शिक्षण, कला, साहित्य, वैयक्तिक सुरक्षा, स्वच्छता तसेच व्यायाम, मानसिक संतुलन राखण्यासाठी आणापान या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रम संचालन व आभार शाळेतील विद्यार्थी यांनी करून सहकार्य करयात आले व वंदे मातरम् या गितानी कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Comment