आमगाँव/गोंदिया :- मध्यरात्रि झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत दोन्ही दुचाकी स्वरांचा मृत्यू. यातील पहिल्या घटनेत (दि. 3 नोव्हेंबर) रोजी रात्री 11 वाजे दरम्यान रेल्वे गेट जवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून जबर धडक दिल्याने दुचाकी स्वार मृतक सुनील लखन ब्राह्मणकर (34)रा. भालीटोला अँजोरा हा गंभीर जखमी झाला त्यास पोलीस पथकाच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय आमगाँव येथे हलविण्यात आले त्यावेळी उपस्थित डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
तर दुसरीकडे त्याच रात्री (दि. 4)रोजी 1 वाजे दरम्यान गोंदिया कडून आमगाँवकडे प्रवास करताना मृतक नमन हेमंत रहांगडाले (17) रा. कोसमटोला आसोली ता. आमगाँव हा दुचाकी क्रमांक MH 35 BA5393 या दुचाकी ने रास्ता दुभाजकावर असलेल्या लोखंडी पाईपला जबर धडक दिल्याने अल्पवयीन नमनचे मृत्यू झाल्याच्या घटनेने आमगाँव परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे. काही तासांच्या अंतरात घडलेल्या या घटनांमुळे दुःखाचे सावट पसरले होते.
वारंवार घडत असलेल्या अशा घटनांमुळे परिसरातील नागरिकांच्या मनात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेद्वारा रात्रपाळीतील गस्त तसेच ड्रंक अँड ड्राइव्ह च्या मोहिमा सुद्धा चालवल्या जात असल्या तरी अशा घटनांमुळे यंत्रणेचे प्रयत्न कुठे कमी पडतात याबाबतच्या चर्चांनी परिसरातील सामान्य नागरिकांचे मन हेलावले आहे. या घटनेची दखल घेत आमगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
