गोंदिया :- तिरोडा रेल्वे स्टेशन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिरोडा वतीने मंडल रेल प्रबंधक, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर यांना निवेदन सादर करण्यात आलं. हे निवेदन रेल्वे स्टेशन तिरोडा येथील प्रबंधकांच्या माध्यमातून प्रेषित करण्यात आले.
त्यामध्ये आरक्षित बोगींच्या स्थानाचा सूचक फलक (डिस्प्ले बोर्ड) प्लॅटफॉर्मवर त्वरित लावण्यात यावा.ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात यावी.रीवा–ईतवारी गोंडवाना एक्सप्रेसला तिरोडा येथे थांबा मंजूर करण्यात यावा.तसेच दुपारी नागपूरकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यात यावी.
या वेळी निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते श्री. अविनाश जी जायसवाल, नरेश भाऊ कुंभारे, राजेश जी गुणेरिया, रामकुमार असाटी, आनंद बैस, सचिन ढबाले, बबलू ठाकूर, कुंदन संगोडे , पिंटू चौधरी सदस्य पंचायत समिति तिरोड़ा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
