लाखांदूर :- देशात आगामी जनगणना २०२६ च्या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्राथमिक शिक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. जनगणनेच्या कामाचा अतिरिक्त भार लक्षात घेता
शिक्षकांना हक्काची अर्जित रजा मंजूर करावी आणि आवश्यक साधनसामग्री तातडीने पुरवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या मागण्या:
निवेदनाद्वारे शिक्षक समितीने प्रशासनासमोर खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
अर्जित रजा (EL) मंजूरी: जनगणनेचे काम सुट्ट्यांच्या कामात किंवा अतिरिक्त वेळेत करावे लागत असल्याने, शासन निर्णयानुसार शिक्षकांना या बदल्यात अर्जित रजा सेवा पुस्तकेत नोंदवून मिळाव्यात.
शिक्षण सेवक हे केवळ १६,०००/ हजार रुपये मानधनावर काम करत आहेत. जनगणनेचे काम करत असतांना, विषेशतः दुर्गम भागात किंवा प्रवासादरम्यान एखादी दुर्दैवी घटना घडल्यास, या शिक्षकांच्या कुटुंबाला कोनताही आर्थिक आधार नसतो. जनगणनेच्या कामावर असतांना अपघात किंवा मृत्यू झाल्यास, संबंधित शिक्षण सेवकांच्या वारसांना किमान २०/ लाख रुपये , सानुग्रह अनुदान आणि विमा सुरक्षा कवच देण्यात यावे.
साधनसामग्रीची उपलब्धता :
प्रगणक म्हणून काम करतांना शिक्षकांना डिजिटल डेटा एन्ट्री साठी हाय- स्पीड इंटरनेट,टॅबलेट किंवा आवश्यक स्टेशनरी आणि ओळखपत्र वेळेत उपलब्ध करून द्यावीत.
प्रवास भत्ता आणि सुविधा:
दुर्गम भागात सर्वेक्षणासाठी जाणाऱ्या शिक्षकांना योग्य प्रवास भत्ता आणि फिल्डवर काम करताना पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधा मिळाव्यात.
कामाचे ताण कमी करणे:
शैक्षणिक कामकाज आणि जनगणनेचे काम यात समन्वय राखून शिक्षकांवरील अशैक्षनिक कामाचा ताण कमी करावा.
प्रशासनाची भूमिका:
निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदारांनी या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली. जनगणनेचे काम राष्ट्रीय कर्तव्याचा भाग असून, शिक्षकांना तांत्रिक किंवा प्रशासकीय स्तरावर कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल अशी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.तसेच रजेच्या तांत्रिक बाबींबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे संकेतही दिले.
शिक्षक समितीचा इशारा:
” शिक्षक नेहमीच राष्ट्रीय कार्यात हिरीरीने सहभागी होतात, परंतु त्यांच्या हक्काच्या रजा आणि कामासाठी लागणाऱ्या किमान सुविधांबाबत प्रशासनाने उदासीन राहू नये. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर संघटनेच्या वतीने पुढील पावले उचलले जातील, असे शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष, हेमक्रूष्ण दोनाडकर
, सचिव तुषार टेकाम, कार्याध्यक्ष अरुण कोटांगले , तालुका प्रवक्ता हेमंत राऊत आणि मोठ्या संख्येने
शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
