तिरोडा तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर छापा; १० सिलेंडर जप्त

तिरोडा प्रतिनिधी : घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवडा होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्या आदेशानुसार घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर थांबविण्याच्या उद्देशाने तिरोडा तालुक्यात विविध ठिकाणी(दि. 12 मार्च) रोजी छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान काही हॉटेल व दुकानांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आल्याने प्रशासनाने सिलेंडर जप्त केले.

या छापेमारीत पुढील ठिकाणी कारवाई करण्यात आली –

करिश्मा बार अँड रेस्टॉरंट – १ सिलेंडर, न्यू ताज बिर्याणी फॅमिली रेस्टॉरंट, – २ सिलेंडर, कटनकर स्वीट्स अँड नमकीन – १ सिलेंडर, टंग ट्विस्टर सेंटर – २ सिलेंडर, बाबा भोजनालय अँड बिर्याणी सेंटर – २ सिलेंडर, जानी डेली नीड्स – २ सिलेंडर असे एकूण १० घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.

ही कारवाई तहसीलदार. एन. एम. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात निरीक्षण अधिकारी एम. एम. राऊत, नायब तहसीलदार ए. पी. मोहनकर, पूरवठा निरीक्षक दिगंबर गव्हाणे, पंकज जनबंधू (लिपिक) तसेच अश्विन वासनिक यांनी सहभाग घेत कार्यवाही पार पाडली.

प्रशासनाने व्यावसायिकांना घरगुती गॅस सिलेंडरचा वापर न करण्याचे आवाहन केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment