ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

धान खरेदी उद्दिष्ट वाढविण्याची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन

राजू फुंडे | प्रतिनिधी, सालेकसा

सालेकसा : तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी व नागरिकांच्या वतीने रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट (लिमिट) वाढविण्याच्या मागणीसाठी आज जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांच्या नावे सालेकसा तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ब्रजभूषण जागेश्वरसिंह बैस यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सालेकसा तालुक्यात दरवर्षी शासनामार्फत आदिवासी सहकारी संस्थांमार्फत व मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून रब्बी हंगामातील धान खरेदी केली जाते. मात्र यंदाच्या हंगामात खरेदीचे निश्चित उद्दिष्ट पूर्ण झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान अद्यापही सोसायट्यांमध्ये व घरांमध्ये पडून आहे.

यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या धानाची विक्री रखडली आहे. शासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविल्यास उर्वरित शेतकऱ्यांचे धान विक्री होऊन त्यांना आर्थिक दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने या विषयाकडे तात्काळ लक्ष देऊन रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात आल्या असून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment