ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

माँ वैष्णवी पेट्रोल पंप ग्राहकांच्या विश्वासाचे केंद्र; संचालक अजय क्षीरसागर यांचे कार्य प्रेरणादायी

 

राजू फुंडे/सालेकसा, प्रतिनिधी : तालुक्यातील दरे-कसा रोडवरील मा वैष्णवी पेट्रोल पंप हे केवळ इंधन भरण्याचे केंद्र नसून ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेले आदर्श सेवा केंद्र म्हणून ओळखले जात आहे. उत्कृष्ट सेवा, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीमुळे या पेट्रोल पंपाने परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या यशामागे पेट्रोल पंपाचे संचालक अजय दुलीरामजी क्षीरसागर यांची अथक मेहनत, दूरदृष्टी आणि प्रामाणिक व्यावसायिक वृत्ती महत्त्वाची ठरली आहे. ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासोबतच त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यामुळे महावैष्णवी पेट्रोल पंपावर ग्राहकांचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे.

व्यवसाय क्षेत्रात सचोटी आणि प्रामाणिकपणा जपत यशस्वी वाटचाल करणारे अजय क्षीरसागर हे आज अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. कठोर परिश्रम, नियोजनबद्ध कामकाज आणि ग्राहक सेवेप्रती असलेली बांधिलकी यांच्या जोरावर व्यवसायात यश मिळविता येते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखविले आहे.

स्थानिक सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग उल्लेखनीय असून, समाजाशी नाते जपत व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा त्यांचा दृष्टिकोन कौतुकास्पद मानला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मां वैष्णवी पेट्रोल पंपाने ग्राहक सेवा आणि विश्वासार्हतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

अजय दुलीरामजी क्षीरसागर यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल परिसरातील नागरिक, ग्राहक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment