भाजयुमो सौंदड मंडळाची विस्तारित बैठक संपन्न, नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्या जबाबदाऱ्या..
गोंदिया : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सौंदड मंडळाची विस्तारित बैठक स्थानिक विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीदरम्यान भाजयुमोच्या नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. तसेच नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक युवकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धती व विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.
घोषित नव्या कार्यकारिणीनुसार विवेक भेंडारकर यांची भाजयुमो सौंदड मंडळ अध्यक्षपदी, हिमांशू राऊत यांची मंडळ महामंत्रीपदी तसेच सारंग सदू विठ्ठले यांची भाजयुमो सौंदड नगराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवर व वरिष्ठ नेत्यांनी शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
बैठकीस भंडारा-गोंदिया विभागाचे विरेंद्रभाऊ अंजनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, पंचायत समिती सभापती चेतनभाऊ वडगाय, भाजयुमो गोंदिया जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल, ग्रामपंचायत सरपंच हर्ष मोदी, सडक अर्जुनी मंडळ अध्यक्ष राजेश कठाणे, विलासभाऊ बागड, ललित डोंगरवार, जिल्हा महामंत्री विक्की बघेले, अभय मानकर, अजीत टेंभरे तसेच चरणदास सहारे यांच्यासह भाजप व भाजयुमोचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत संघटना अधिक बळकट करण्यासाठी, आगामी पक्षीय कार्यक्रम, युवकांची राजकीय व सामाजिक क्षेत्रातील भूमिका तसेच संघटन विस्तार यांसारख्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्त्यांनी युवकांना गावोगावी जाऊन संघटना मजबूत करण्याचे आणि पक्षाच्या धोरणांचा जनसामान्यांपर्यंत प्रसार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे बूथस्तरीय कार्यकर्ते, भाजयुमो पदाधिकारी, वरिष्ठ कार्यकर्ते तसेच विविध प्रकोष्ठ व मोर्चांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संचालन हर्ष विनोदकुमार मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारंग सदू विठ्ठले व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी सौंदड मंडळातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व नव्याने नियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला की, नवी टीम संघटनेच्या विस्तार व सशक्तीकरणासाठी प्रभावीपणे कार्य करेल तसेच युवकांना पक्षाशी जोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
