आमगाव :- मा. आमदार संजयजी पुराम यांची पुराळा येथील राहत्या घरी(दि .29) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आमगाव तालुक्यातील विविध विकास कामांबाबत चर्चा केली व निवेदन सादर केले.
यावेळी आमगाव–कामठा–रावणवाडी रस्त्याची टेंडर प्रक्रिया त्वरित पूर्ण करून काम सुरू करणे, धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविणे, घरकुल लाभार्थ्यांना वेळेवर निधी उपलब्ध करून देणे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना प्रलंबित असलेले पैसे त्वरित मिळवून देणे, नवीन घरकुल लाभार्थ्यांची निवड, किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे थांबलेले पैसे व पायपेटी बंद होण्याच्या समस्या, पाणीटंचाई तसेच इतर जनहिताच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी मा. आमदार संजयजी पुराम यांना निवेदन देण्यात आले.
मा. सुरेश हर्षे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती रविकुमार सिरसागर सहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जियालाल भाऊ पंधरे माजी जि प सदस्य माननीय राजेश भक्त वरती उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, टीकाराम भाऊ मेंढे वरिष्ठ नेते, पियुष झा वरिष्ठ नेते, चुनीलालजी सहारे वरिष्ठ नेते, सुभाष यावलकर ओबीसी नेते राष्ट्रवादी, महेंद्रजी रहांगडाले कार्यकारी अध्यक्ष, राजकुमार प्रतापगडे, सूनिल ब्राह्मणकर, तुलेंन कटरे , प्रमोद शिवणकर, विजयजी मुनेश्वर, विनोद चूटे, गिरीश पटले, तुकडू भाऊ रहांगडाले, नामदेवजी दोनोडे, प्रवीण मेंढे यांनी उपस्थित राहून माननीय आमदार महोदया सी चर्चा करून आमगाव तालुक्याच्या विकासाला गती द्यावी ही विनंती केली.
