गोंदिया :- जिल्ह्यात आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा खीळखिळी झाली असे म्हणता येईल त्याला कारण असे की दुपारी दोन वाजे तालुका आरोग्य पथकाच्या कार्यालयाला कुलूप लागलेला होता. ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा तालुक्यातीलच एक नागरिक शासकीय कामाकरिता कार्यालयास भेट दिली असता तेथे थेट कुलूप बंद असल्यामुळे तो काम करू शकला नाही सदर घटना (दि. 24 फेब्रु.) रोजी दुपारी दोन वाजे दरम्यानची तालुका आरोग्य पथक आमगाव येथील आहे. त्यानंतरही सुमारे दोन तास त्याने त्या ठिकाणी वाट पाहिली पण कोणतेही अधिकारी कर्मचारी न परतल्याने अतिशय नैराश्याने त्याला परत जावे लागले. सदर व्यक्ती हा तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून शासकीय कामासाठी थेट आरोग्य पथक येथे आला होता. परंतु शासकीय वेळेवर कार्यालयाला कुलूप बंद असल्यामुळे त्याला आश्चर्याच्या धक्का बसला. त्याने परिसरात विचारपूस केली असता त्याला कुणाकडूनही योग्य प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे शेवटी हतबल होऊन त्याला तिथून परत जाण्याशिवाय कोणताही मार्ग उरला नव्हता.
गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा एकात एक नवीन उपक्रम राबवण्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळवते तेच दुसरीकडे त्यांचे तालुका आरोग्य पथक कार्यालयाला कार्यालयीन वेळेवर कुलूप बंद राहते. याला प्रगती की अधोगती काय म्हणणार? विकास की भकास? तेव्हा कार्यालयीन वेळेवर कार्यालयाला कुलूप लावण्याचे आदेश कोणी दिले होते? सगळेच अधिकारी कर्मचारी एकाच वेळेवर कसे गायब होते याची चौकशी होणार का ? हा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
आरोग्य सभापती महोदयांनी लक्ष देण्याची गरज..
जिल्हा परिषद येथील आरोग्य विभागाचे सभापती देखील याच आमगाव तालुक्यातून येतात मात्र त्यांच्याच क्षेत्रात असलेल्या तालुका आरोग्य पथक कार्यालयाला कार्यालयीन वेळेवर कुलूप बंद असणे यापेक्षा मोठी धक्कादायक बाब काय असू शकते. म्हणूनच खेदाने असे म्हणता येईल की जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे आरोग्य हे ऑल इज वेल नाही त्यावर कुणाचेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही या विभागाची कितीही प्रशंसा केली तरी पळसाला पाने तीनच असे बोलून तेथील स्थानिक नागरिकांनी खंत व्यक्त केली.
