प्रो. डाँ. बबन मेश्राम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल अवॉर्ड

 

गोंदिया- :- महाराष्ट्र राज्याची राजधानी तथा मायानगरी मुंबई येथे ह्यूमन राइट्स काउंसिल ऑफ इंडिया द्वारा आयोजित तेरावे वार्षिकोत्सव कार्यक्रम व ग्लोबल पीस समिट कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच मुंबई येथे करण्यात आले होते. ज्यात सम्पूर्ण देशातील निवडक शख्सियत यांच्या द्वारा करण्यात आलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सम्मानित करण्यात आले। सदर कार्यक्रमात लाँयन्स क्लब भंडारा ब्राससिटीचे अध्यक्ष तथा एन. एम. डी महाविद्यालय गोंदिया येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डा. बबन मेश्राम यांना सामाजिक,कला व संस्कृति क्षेत्रात उत्कृष्ठ कार्याबद्दल प्रतिष्ठित पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल अवॉर्डने सम्मानित करण्यात आले.पुरस्कारा अंतर्गत एक ट्राफी व प्रशस्तिपत्र देवून गौरव करण्यात आले.

पुरस्कार भारतीय मानवाधिकार परीषद चे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख द्वारा जी. सी. सी क्लब मिरा रोड मुंबई येथे 12 जानेवारी रोजी प्रदान करण्यात आले.
डाँ. बबन मेश्राम हे भारतीय मानवाधिकार परीषद चे सक्रिय आजिवन सभासद आहेत. त्यांनी गोंदिया-भ़डारा जिल्ह्यात तिन वर्षात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून सामाजिक कार्य हे मन लावून निस्वार्थी पणे करतात तसेच विभिन्न सामाजिक सेवा चे माध्यमातून गरीबों, महिलाओं,बुजुर्ग व्यक्ती,अपंग तथा अनाथ छात्रो को आर्थिक सहाय्यता, शासनाचे विविध उपक्रम याचा लाभ मिळविण्यासाठी मदत व गरजूना सायकल, शिलाई मशीन, शालेय उपयोगी वस्तू, भोजन साम्रगी, नि:शुल्क कायदे विषयक सल्ला देतात, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन करु सात जोडपे यांचा विवाह बंधनात मदत केली.जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैद्य धंदे,नशाच्या विळख्यात सापडलेल्या अनेक महाविद्यालयीन युवकांना समउपदेश करुन त्याना व्यसनमुक्ती करणे,शहरातील अपराध थांबविण्याकरीता संबंधित विभागास मदत करने अशा विवीध सेवा व कार्याकरीता भारत रत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल पीस अवार्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले.

डाँ. बबन मेश्राम हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठातील समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य व राष्ट्रीय सेवा योजना चे जिल्हा समन्व्यक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
कार्यक्रमात 28 राज्यातील शेकडों मान्यवरांनी सहभाग घेतला होता. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, एक्स आर्मी चिफ राजेंद्र सि़ह वालिया, बौद्ध भंन्ते महाथेरो डाँ. राहुल बोधी,महावर्तन फाउंडेशन संस्थापक स्वामी श्री देवेन्द्र ब्रम्हचारी जी उपस्थित होते.
डाँ. मेश्राम यांनी प्राप्त अवार्ड चे श्रेय गोंदिया शिक्षण संस्था चे संरक्षक खा. प्रफुल्लभाई पटेल, अध्यक्षा श्रीमती वर्षाताई पटेल, सचिव राजेंद्रजी जैन, संचालक निखिल जैन, एन. एम. डी महाविद्यालय चे प्राचार्य डाँ. रविंद्र मोहतुरे, सुलभा शिक्षण संस्था के अध्यक्षा डाँ.सुलभा मेश्राम यांना दिले आहे.
डाँ. मेश्राम यांचे महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षेकेत्तर कर्मचारी, लायन्स क्लब परीवारातील सदस्य तसेच राष्ट्रीय सेवा योजना चे जिल्हयातील स्वंयसेवक व हितचिंतक यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुरेख संचालन राष्ट्रीय ख्यातीप्राप्त एंकर व विश्व रेकार्ड होल्डर राजस्थान चे अंकित खंडेलवाल यांनी केले हे विशेष होते.

Leave a Comment