गोंदिया, 17 जानेवारी:- महाराष्ट्र राज्य शिवभोजन संघटनेची गोंदिया जिल्हा बैठक आज शासकीय विश्रामगृह, गोंदिया येथे पार पडली. या बैठकीत सन 2026 साठी जिल्हा संचालक मंडळाची निवड सर्वानुमते करण्यात आली.
गोंदिया जिल्हाध्यक्षपदी पिंटू बावनकर यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा उपाध्यक्षपदी तेजराम मोटघरे व धीरज पाठक यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा सचिव म्हणून उमंग साहू तर जिल्हा सहसचिवपदी भूमेश्वर यूरकुडे यांची निवड करण्यात आली.तसेच तालुका प्रमुखांची निवड करण्यात आली असून तिरोडा लोकेश मेश्राम, गोरेगाव रोहित येरने, आमगाव प्रशांत गायथने, सालेकसा रवि चुटे व देवरी सुनील मिश्रा यांची तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
बैठकीत उपस्थित सर्व संचालकांनी एकमताने सर्व नियुक्त्यांना मंजुरी दिली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
