सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत जयांश सचिन ढबालेने पटकाविले सुवर्ण पदक..!

 

अर्जुनी मोरगाव, प्रतिनिधी — सरस्वती दयानदीप कॉन्व्हेंट, अर्जुनी मोरगाव येथील इयत्ता ४ थीचा विद्यार्थी जयांश सचिन ढबाले याने राष्ट्रीय स्तरावर आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रंग उत्सव सेलिब्रेशन मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जयांशने उत्कृष्ट हस्ताक्षर सादर करत  सुवर्णपदक पटकावले.

या यशाबद्दल रंग उत्सव सेलिब्रेशन मंच तर्फे आयोजित समारंभात जयांश ढबाले याला गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून शिक्षक, पालक आणि सहविद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

जयांशच्या या यशासाठी त्याच्या पालकांचे मार्गदर्शन तसेच शाळेतील शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. भविष्यातही तो विविध स्पर्धांमध्ये अशीचउज्ज्वल कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment