रिंगरोड वरील अपघातात मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू..! 

 

गोंदिया :- दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतुकीची कोंडी अत्यंत जीवघेणे बनत चाललेली आहे. याचे जिवंत दर्शन घडवणारी घटना दिनांक ६ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान गोंदिया येथील रिंग रोड टी पॉईंट वर घडली. या घटनेत बालाघाट कडून गोंदियाच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वार मृतक संध्या मनीष तूपट वय 32 वर्षे व शिवंश राजेश तुपट वय चार वर्षे दोन्ही राहणार जामकांदरी मोहाडी जिल्हा भंडारा यांच्या दुचाकीला तिरोड्याकडून बालाघाट च्या दिशेने जाणाऱ्या टिप्पर क्रमांक MH 35 AJ 9497 ने जबर धडक दिली. त्यात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन रामनगर चे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी घटनास्थळी दाखल होऊन पिडित्यांना केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलविले तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची दखल घेत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेने परिसरातील रहिवाशांच्या मनात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment