दिवाळीनिमित्त लाल परी च्या सेवेवर लागणार ब्रेक..!

गोंदिया:- दिवाळी सणाच्या निमित्ताने दिनांक 21 व 22 रोजी जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या प्रवासांना लाल परी ची सेवा पूर्ण काळ मिळणार नाही. त्यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासासाठी वैयक्तिक किंवा इतर साधनांचा वापर करून प्रवास करावा लागेल. अशी माहिती गोंदिया राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवाळी सणानिमित्त जिल्ह्यातील अनेक वाहक चालक सुट्टीवर असल्याकारणाने दैनंदिन स्थानिक प्रवासांच्या प्रवासाला फटका बसणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाश्यानी या बाबीची दखल घेत सर्व काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन आगार प्रमुखांनी केले आहे.

दिवाळी सणानिमित्त लाखो नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सुरक्षित व विश्वासार्ह प्रवास साधनांचा उपयोग करतात. त्यासाठी प्रामुख्याने ते एसटीची निवड करतात पण या दोन दिवसात एसटीची सुविधा खोळंबल्याने प्रवाशांच्या मनात संतापाची भावना व्यक्त होत आहे. अश्या वेळी जन माहिती साठी विविध बस स्थानकावर अपेक्षित वेळापत्रक उपलब्ध करून देणे अपेक्षित होते मात्र आपली यंत्रणा तितकी अपेक्षेप्रमाणे सज्ज नाही असेच यावेळी म्हणता येईल. त्यामुळे प्रवाशांनी आपली सुरक्षा लक्षात घेऊन प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही.

Leave a Comment