बाराभाटी/अ.मोर :- जवळच्या लागुन असलेल्या खांबी पिंपळगाव येथे बुद्ध फुले शाहू आंबेडकरी गायनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, संदीप कापगते उपसभापती पंचायत समिती, दिलवर रामटेके, अनिल दहिवले, तुलाराम खोटेले सरपंच, सचिन डोंगरे मदन रामटेके, रविंद्र खोटेले, शुभम हुमणे, नेमिचंद मेश्राम पो. पा, सुदेश खोटेले, प्रमोद भेंडारकर, शुभम बहेकार, पुरुषोत्तम डोये, घनश्याम भेंडारकर, प्रकाश शिवणकर, विनय खोटेले, विजय लोणारे, किशोर बोरकर, विकास डुंभरे, प्रकाश रामटेके, नाना रामटेके, हेमराज फुंडे, रुतन लोणारे हेमराज डोंगरे, मिनाक्षी मुनेश्वर, शालुताई खोटेले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
मान्यवरांनी महामानव तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आनंद बुद्ध विहार खांबी यांच्या वतीने ६९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तब्बल पाच दिवस रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज जागृती आणि समाजात समता, बंधुता प्रस्थापित होऊन एकता निर्माण व्हावी हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आनंद बुद्ध विहार खांबी येथे अशोक विजयादशमी व ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पाच दिवशीय भीमज्योत प्रज्वलीत कार्यक्रम आयोजित केले आहे. निमित्ताने नव्या क्रांतीचे निळे वादळ युवा ग्रुप खांबी च्या सौजन्याने दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ ८ वाजता आनंद बुद्ध विहाराच्या भव्य आवारात गायक युवराज प्रधान यांच्या बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदनलाल रामटेके तर संचालन योगेश लोणारे व आभार प्रमोद डोंगरे यांनी मानले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नव्या क्रांतीचे निळे वादळ युवा ग्रुप खांबी यांनी घेतला आहे. कार्यक्रमाला बाहेरगावावरून आणि गावातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.
