के.टी.एस.रुग्णालयातील 7 अस्थिव्यंग विद्यार्थी शस्त्रक्रियासाठी रवाना

 

गोंदिया :- जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांची तपासणी आर.बी.एस.के.पथकातील वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत नियोजनबद्ध होत असते. त्यात जिल्ह्यात 99 अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन दि.25 मार्च रोजी बाई गंगाबाई रुग्णालयातील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र येथे डॉ.विराज शिंगाडे, चिल्ड्रेन ओर्थोपेडीक केअर इन्स्टीट्युट, नागपूर यांचे कडून तपासणी करण्यात आली होती.या शिबिरातून एकूण 20 अस्थिव्यंग प्रत्यक्ष शस्त्रक्रीयासाठी निवडण्यात आले.त्यात तालुका आमगाव 02, अर्जुनि मोर 02, गोंदिया 09, सालेकसा 04, सडक अर्जुनी 01 आणि तिरोडा 02, विद्यार्थ्याचा समावेश होता.

 

विशेष गरजा असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे वैद्यकीय तपासणी करून गरजेनुसार शैक्षणिक सहय्यभूत सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.अंगणवाडी तथा इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणा-या लोकोमोटर अकार्यक्षम असलेल्या दिव्यांग मुलांच्या शस्त्रक्रीया केल्यास त्यांचे दिव्यांगत्व कमी होऊन त्यांना दैनंदिन जीवन व्यतीत करण्यास मदत होते तसेच समाजात सन्मानाने जगण्यास व शिक्षण घेण्यास अडथळे आपोआप दूर होत असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.

 

डॉ.विराज शिंगाडे, चिल्ड्रेन ओर्थोपेडीक केअर इन्स्टीट्यूट, अध्यक्ष नागरी नारायनजी मेमोरिअल फॉउडेशन, अजनी चौक, वर्धा रोड नागपूर यांनी पाठविलेल्या पत्रानुसार 20 अस्थिव्यंग विध्यार्थ्यांच्या मोफत शस्त्रक्रीया नागपूर येथे दि. 9 सप्टेंबर पासून करण्यात येणार आहे.

 

आरबीएसके व शिक्षण विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नाने अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना दि. 8 सप्टेंबर रोजी के.टी.एस.सामान्य रुग्णालयातुन 7 अस्थिव्यंग विद्यार्थी प्रविरा हॉस्पिटल नागपूर येथे शस्त्रक्रियासाठी रवाना केल्याची माहीती आरबीएसके समन्वयक संजय बिसेन यांनी दिली आहे.ऑपरेशन प्रसंगी पालक व विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था मोफत होणार आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर तज्ञ डॉक्टर च्या सल्यानुसार नागपूर येथे फॉलोअप आणि फिजिओथेरेपी सुद्धा होणार असल्याची माहीती जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र डीआयईसीचे समन्वयक पारस लोणारे यांनी दिली आहे. त्यात आयुष धमगाये,खुशी डोंगरवार, अवि दुधबराय,संस्कृति मडावी,कार्तिक कावरे,दिशुजा टेंभेकर व विप्लव कावडे यांचा समावेश आहे.

 

 

Leave a Comment