सर्व क्रीडा प्रकाराची जननी जिमनॅस्टिक च्या प्रसारासाठी सर्वस्तरावरून मदत करणार– रवींद्र शिंदे 

 गोंदिया :- महाराष्ट्र अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन व चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन द्वारा विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे आयोजित 16 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय अक्रोबॅटिक्स जिमनॅस्टिकस जजेस कोर्स व परीक्षा च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणिय श्री रवींद्र भाऊ शिंदे , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विवेकानंद ज्ञानपीठ,विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती चे उपाध्यक्ष व चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे नवनिर्वाचित डायरेक्टर आदरणीय श्री जयंत भाऊ टेमुर्डे , तर विशेष अतिथी म्हणुन विवेकानंद महाविद्यालय चे प्राचार्य मा.डॉ एन.जी.उमाटे सर, उपप्राचार्य मा.एस.जी.आष्टुनकर सर , फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल जिमनॅस्टिकस FIG च्या इंटरनॅशनल एक्सपर्ट जिमनॅस्टिक कोच,जज कु प्राची पारखी मॅडम (इंटरनॅशनल मेडलिस्ट), विवेकानंद महाविद्यालय भद्रावती च्या स्पोर्टस् डायरेक्टर प्राध्यापक संगीता बांबोडे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

 

चंद्रपुर जिल्ह्यामध्ये 2001 पासुन जगातील सर्व क्रीडा प्रकाराची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिमनॅस्टिकस या ऑलिम्पिक क्रीडा प्रकाराचे नियोजनबद्ध प्रशिक्षण सुरू करणारे चंद्रपुर सुरू करणारे चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन चे संस्थापक व सचिव श्री दुर्गराज रामटेके यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन चे उपाध्यक्ष व महाराष्ट्र अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन चे अध्यक्ष आदरणिय संजय शेटे सर, (मुंबई,) राज्य सेक्रेटरी आदरणीय प्राचार्य डॉ मकरंद जोशी सर ( छत्रपती संभाजी नगर), राज्य उपाध्यक्ष आदरणीय श्री महेंद चेंबुरकर (चेंबुर, मुंबई) यांच्या तांत्रिक सहयोग व मार्गदर्शनाखाली या कोर्स चे आयोजन करण्यात आले आहे. ज्या मधे राज्य असोसिएशन च्या सुचणे नुसार 14 जिल्ह्यातील फक्त 30 कोचेस नाच सहभाग देण्यात आलेला आहे.

 

या कोर्स च्या यशस्वी आयोजन करण्यासाठी चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन व आयुषी जिमनॅस्टिकस अकादमी चंद्रपुर च्या अध्यक्षा शीतल रामटेके, चेअरमन नीलेश गुंडावार, उपाध्यक्ष अँड राजरत्न पथाडे प्रमोटर आशुतोष गायनेवार, टायझन स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक जनार्दन कुसराम सर, भारत बिसेन, संजय माटे, बी एल करमनकर, करण डोंगरे,आयुषी रामटेके, ऋतुजा माटे,राकेश राय, अशोक कामडे,विवेक करमनकर,किरण राजुरकर,पांडुरंग भोयर,गौतम भगत व सर्व पदाधिकारी सदस्य चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन यांनी प्रयास केला आहे.

Leave a Comment