वरठी :- वरठी पोलीस स्टेशनच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 12 जुलै रोजी मोहगाव देवी येथील सुर नदी पात्रात धडक कारवाई करत अवैध रेती उत्खननाचा पर्दाफाश केला. कारवाईदरम्यान दोन ट्रॅक्टरद्वारे विनापरवाना रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाची चाहूल लागताच एका ट्रॅक्टरचा चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. तर दुसऱ्या चालकाने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ट्रॉलीतील रेती हायड्रॉलिकच्या सहाय्याने खाली करून ट्रॅक्टर सोडून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून स्वराज 735 FE व आयशर 480 हे दोन ट्रॅक्टर, दोन विनाक्रमांक ट्रॉली आणि सुमारे 2 ब्रास रेती असा एकूण ₹12 लाख 12 हजार किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. याप्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात अप. क्र. 379/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) व 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास वरठी पोलीस करीत आहेत.
…
