ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

सालेकसा रेल्वे स्टेशन येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजू फुंडे प्रतिनिधी, सालेकसा:- दि. २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र गोर्रे व उपकेंद्र आमगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने सालेकसा रेल्वे स्टेशन येथील बूथ क्रमांक २२ वर लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला.

या मोहिमेचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते ब्रजभूषण बैस यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस पाजून करण्यात आला. प्रारंभी शिवांश येडे, सानवी येडे आणि रिद्धी येडे या बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आशा सेविका श्रीमती मंजू सुरेश मेंढे, आरोग्य सेविका श्रीमती अल्का उईके तसेच मदतनीस श्रीमती शीला कांबळे यांनी परिश्रमपूर्वक कार्य केले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र गोर्रे व उपकेंद्र आमगाव खुर्द यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले की, “पोलिओमुक्त भारत” ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओचे दोन थेंब आवर्जून पाजावेत. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या या जनहिताच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन पोलिओ निर्मूलनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Comment