राजु फुंडे प्रतिनिधी सालेकसा ::-ग्रामोत्थान शिक्षण संस्था आमगांव द्वारा संचालित ग्रामविकास विद्यालय तिरखेड़ी येथे लांब आणि समर्पित सेवा देणारे शाळेचे सहायक शिक्षक ग्यानीराम तिजुलाल बनोठे यांचा सेवानिवृत्ति सम्मान समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावुक माहौल मध्ये संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार भेरसिंगभाऊ नागपुरे होते. सत्कारमूर्ती म्हणुन सहायक शिक्षक ग्यानीराम बनोठे उपस्थित होते.
प्रमुख अतिथि म्हणून ग्रामोत्थान शिक्षण संस्था आमगाव चे सचिव आणि माजी जिला परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, लोधी समाज संस्था आमगाव चे प्रमुख आणि भाजप चे माजी जिला अध्यक्ष अधिवक्ता येशूलाल उपराडे, ग्रामीण बँक बालाघाट चे मॅनेजर लिलाधर सुलाखे , शिक्षक सी.बी.पानतावणे, आलोक चे राष्ट्रीय वरिष्ठ महिला उपाध्यक्ष सौ.सुखवंता बनोठे, आलोक महाराष्ट्र राज्य चे प्रदेश अध्यक्ष नरेंद्र लिल्हारे , आलोक महाराष्ट्र प्रदेश चे संयोजक रोशनलाल लिल्हारे, केन्द्र प्रमुख शांता पाचे झालिया उपस्थित होते.याप्रसंगी लोधी समाज सेवा समिती आमगाव चे अध्यक्ष जागेश्वर लिल्हारे, सचिव रोशन गराडे़, सहसचिव केवलचंद मच्छिरके, कोषाध्यक्ष युवराज बसोने , संयोजक – देवेन्द्र मच्छिरके, प्रेमचंद दसरिया ,सेवक बनोठे, कृष्णकुमार गयगए ,तोषलाल लिल्हारे ,रामचंद्र लिल्हारे , पुष्पा दिनेश ढेकवार, स्विटी कमलेश मच्छिरके,कवि हेमंत मोहारे, आलोक महाराष्ट्र राज्य मीडिया प्रभारी राजकुमार बसोने, सुरेश वाघाडे, करंडे सर, बलीराम बनोठे,दिलीप बनोठे यांच्या सह मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते. यावेळी सत्कार मुर्ती सहायक शिक्षक ग्यानीराम बनोठे यांच्या शाल व श्रीफल तथा भेटवस्तु देऊन सपत्नीक सत्कार करण्यातआले. याप्रसंगी माजी आमदार
भेरसिंग नागपुरे, माजी जिला परिषद उपाध्यक्ष विजय शिवनकर, अधिवक्ता येशुलाल उपराडे , बैंक मैनेजर लीलाधर सुलाखे , हेमंत मोहारे यांनी आपले विचार मांडून बनोठे यांच्या दीर्घ शैक्षणिक सेवा चे सराहना करून आणि विद्यार्थियांचं व्यक्तित्व निर्माण व शाळेची प्रगति मध्ये त्यांचे अमूल्य योगदान बद्दल आभार मानले .
निरोप च्या वेळी श्री बनोठे यांनी शाळे प्रति आपले प्रेम दाखवून त्यांनी भविष्यात पण शाळेच्या विकासा साठी नेहमी प्रयत्न शील राहणार असे आश्ववासन दिले.कार्यक्रमाचे शेवटी श्री बनोठे यांना निरोप देताना माहोल भावनांमय झाला होता.उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामवासी, सहयोगी आणि विद्यार्थियांनी श्री बनोठे यांना त्यांचे स्वस्थ आणि सुखद जीवन साठी शुभेच्छा दिले. कार्यक्रमाचे संचालन संकेत बनोठे यांनी केले.एक चांगले शिक्षक उचित सन्मान सम्मान देऊन कार्यक्रमाचे समारोप सुरूची भोजनाणे झाले.
