सालेकसा :- तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक -युवतीना रोजगार मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणी मुरकुडोह ग्रामपंचायत सदस्य मुकेश इनवाते यांनी नामांकित कंपनी सोलार डिफेन्स अँड ऐरोस्पेस लिमिटेड, सावंगा नागपूर यांना आमंत्रित करुन दि. १ जून रोजी गोंडवाना सभागृह सालेकसा येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित केला. आणी शेकडो तरुण तरुनींनी यावेळी सहभाग नोंदवून सोलार डिफेन्स कंपनीत नोकरीं निश्चित केली.
हि कंपनी संरक्षण क्षेत्रात आर्मी, नेव्ही, एअरफोर्स साठी विस्फ़ोटके आणी शस्त्र निर्मितीचे उत्पादन करते. कंपनी स्टॉक लिस्टेड असून नुकताच कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पदमश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रोजगार मेळाव्या सोलार मध्ये डिफेन्स अँड ऐरोस्पेस लिमिटेड चे एचआर मॅनेजर आशिष ढाकळे, कंपनी प्रतिनिधी विलास उईके, प्रकाश इवनाते यांनी उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या. तरुण – तरुणीना नोकरीं पक्की झाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला.
