नवजात बालकाच्या चोरीने परिसरात हळहळ, घरात दुःखाचे सावट..!

गोंदिया :- रावणवाडी पोलीस ठाण्याचे अंतर्गत ग्राम डांगुर्ली येथे दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजे दरम्यान वीस दिवसाच्या नवजात मुलाला चोरून नेल्याचे प्रकरण घडल्याने परिसरातील जनतेच्या मनात हळहळ व्यक्त होत आहे.

त्याचे झाले असे की, रात्री दहा वाजे दरम्यान मुलाची आई शौचालयास जाण्याच्या निमित्ताने बाहेर पडली व काही मिनिटात परत येताच वीस दिवसाचा बालक बेपत्ता झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती महिलेने आपल्या पतीला तसेच नातेवाईकांना दिली.लगेच आजूबाजूच्या परिसरात शोधून देखील बाळ न मिळाल्यामुळे पोलीस स्टेशन रावणवाडी येथे फिर्याद नोंदवण्यात आली.या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात व अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक शशिकरण नवाकार यांच्या चमूने मागील 24 तासापासून चौखं बंदोबस्तात तपास सुरू केले तरी अद्याप बेपत्ता झालेला बालक मिळालेला नाही.

 

वीस दिवसाचा बालक मातेपासून थोडा वेळ लांब असला तरी तो चोरीला जाईल अशी कल्पना स्वप्नात देखील करता येणे शक्य नाही असे क्वचितच घडले असेल, तरीही ही बाब विश्वास ठेवण्यासारखी नाही. तरी सदर घटनेची सत्यता या प्रकरणाशी तंतोतंत जुळत असल्याने परिसरात तील लोकांच्या मनात आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस पथक या विषयाची कसून चौकशी करत असून लवकरच याविषयी अनेक शंका कुशंकांना विराम देऊन सदर प्रकरणाचा उलगडा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment