महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री काळाच्या पडद्याआड..!

गोंदिया:- महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेवराव शिवणकर यांचे आज (दि. 20 ऑक्टोबर) रोजी सकाळी आठ वाजे दरम्यान वृत्द्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिनांक 21 रोजी 10 वाजे दरम्यान साखरीटोला घाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

ते पाच वेळा आमदार म्हणून तर एकदा चिमूर लोकसभेचे खासदार म्हणून त्यांनी कार्यकाळ सांभाळला आहे. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना सिंचन मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी काम पाहिले आहे. त्याकाळी त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज जिल्ह्यात कलपथरी, बेवारटोला, ओवारा, पुजारी टोला, कलीसरार यासारखे मोठे सिंचन प्रकल्प जिल्ह्यात आहेत. त्यामुळे हजारो एकर शेतीच्या सिंचनासाठी लाभ होत आहे. तसेच गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये सुद्धा त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्यात पक्षाची मोठी हानी झाली असल्याचे वक्तव्य जनतेकडून होत आहे. त्यांच्या मागे त्यांची मुलं विजय तथा संजय शिवणकर सहित बराच मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोक कळा पसरली आहे.

Leave a Comment