ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

संगमकुमार यांचा नायक ते गायक विस वर्षाचा प्रवास आला फलश्रृतीस …!

 

जेष्ठ गीतकार पुरस्कार प्रदान : कष्टाच्या फलश्रृतीची झाडीपट्टी विकास मंडळाने घेतली दखल

 

मुन्नाभाई नंदागवळी बाराभाटी/अ. मोर :-             मानव जन्माला आला की आयुष्याचे सोने करता येते. पण ते अविरत अशा श्रमाने प्रदीर्घ कालखंड काम करुन आपले नाव हे अनेकांच्या काळजावर कोरणे हे साधारण व्यक्तिचे काम नव्हे. रसिकांच्या मनावर राज्य करणारा झाडीपट्टी रंगभूमीवर आपले अधिराज्य गाजविणारे नायक ते गीतकार व गायक असा ठसा उमटविणारे येरंडी गावचे संगमकुमार नंदागवळी यांच्या अभिनयाचा आजही ठपका श्रोत्यांवर प्रचंड आहे. म्हणून ते झाडीपट्टीचे जेष्ठ गीतकार ठरले. 

    अर्जुनीमोरगाव तालुक्यातील येरंडी या लहानशा गावकुसातील हे व्यक्तिमत्त्व आहे. शिक्षण घेताघेता कलेच्या क्षेत्रात आपणही रंगावे. अशा आपल्या मन पटलावर विश्वास ठेवून ग्रामीण भागातील नाटकामध्ये काम करत असताना विदर्भाच्या झाडीपट्टी रंगभूमीत प्रवेश झाला. यावेळी अनेकांनी पसंती केली. आजवर त्यांनी १००० च्यावर झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकामध्ये आपली नायक पासून गायक आणि गीतकार असी भूमिका सतत २० वर्षापासून साकारत आहेत. 

     भूमि अभीलेख शासकीय विभागात सेवा करुनही रंगभूमीवर आपला अभिनय व आवाजाची जादू आजही विदर्भातील रसिकांवर चालवली आहे. सामाजिक प्रबोधनकार कार्यक्रम अशी त्यांनी ५०० प्रयोगाच्यावर सादर केले. त्यांच्या गीतांची दखल युवराज प्रधान यांच्या ध्वनीफीत ‘तू चांदणी’ यामध्ये गीत घेण्यात आले आहे. “ही दुनिया कुणासाठी” फुलपाखरू तू बागेचा, मी तूला पाहीले या गीतांना तर रसिकांनी डोक्यावर घेतले. डॉ अनिरुद्ध वनकर या गायकाचे गाणी ऐकत गाणी गायनाला सुरुवात केली आणि झाडीपट्टी रंगभूमीत मानाचा तुरा रोवला. त्यांनी झाडीपट्टी रंगभूमीच्या ७-८ मंडळात काम करत आजही सुरु आहे.

     विशेष म्हणजे वडसाच्या झाडीपट्टी रंगभूमी विकास मंडळाने यंदाच्या ५ व्या झाडीपट्टी नाट्य संमेलनात कामाची दखल घेऊन परिश्रमाची जाण ठेवून जेष्ठ गीतकार हा झाडीपट्टीचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यामध्ये संमेलनाध्यक्ष प्राचार्य के आत्माराम, पदमश्री डॉ परसुराम खूणे, स्वागताध्यक्ष रामदास मसराम, डॉ. शेखर डोंगरे, शेखर पटले तसेच ज्ञानेश्वरी कापगते तथा जेष्ठ श्रेष्ठ कलवांताच्या उपस्थित सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

गीत, अभिनय व नाट्यलेखक अशी भूमिका

वयाच्या १८ वर्षापासून या क्षेत्राचा छंद जोपासला, ते सत्यात उतरविले. समाजात जागृती केली. अनेक गीत, चार नाटके, समाज प्रबोधन, हौसी नाटके ते झाडीपट्टी प्रवास या कलागुणांनीच झाला.

————————

    मी तब्बल वीस वर्षाच्यावर झाडीपट्टी रंगभूमीची अविरत सेवा करतो. ५०० रुपयांपासून सुरुवात झाली होती आज मान सन्मान उत्तमच, माझे अभिनय व गायन आजही लोकांना पसंत असल्यानेच टिकून आहे. रसिकांचे प्रेम ही माझी फलश्रुती व श्रीमंती समजतो. 

_ संगमकुमार नंदागवळी, झाडीपट्टी गीतकार, गायक व लेखक

———————————

      या यशामागे खरी प्रेरणा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घेऊन अनेक कलाकारांनी अभिनयाबद्दल मार्गदर्शन करत सहकार्य केले. आई वडील, तिलक देवळीकर, यशवंत ढोरे, युवराज प्रधान, अनिरुद्ध वनकर संजय ठवरे, कमलाकर बोरकर, शेखर पटले, ज्ञानेश्वरी कापगते, स्वप्नासंगम, चेतन वळगाये, संतोषकुमार, सुरेश रामटेके, अरविंद बोदेले यांनी मोलाचे सहकार्य केले. अभिनंदन व कौतूक केले. 

Leave a Comment