जीएनटी इंग्लिश स्कूल मध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा

भंडारा :- कृषीप्रधान देशात असलेल्या आपल्या भारतात अन्नधान्य पिकवण्यासाठी बळीराजासोबत शेतात जीवतोड मेहनत करणाऱ्या बैलांप्रती आदर, प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नुकता जीएनटी इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात बैलपोळ्याचा दुसरा दिवस म्हणजेच तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष स्थानी सुबोध शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य जी. एन. टिचकुले तर अतिथी म्हणून शिल्पा बागडे व संध्या कळंबे उपस्थित होत्या. यावेळी सर्वप्रथम चिमुकल्यांनी सुशोभित करून आणलेल्या नंदीबैलांचे अध्यक्षांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच नृत्य स्पर्धा, नंदी सजावट व महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा इ. विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या. या स्पर्धाच्या माध्यमातून चिमुकल्यांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये हर्षद बिलवणे ,जय चांदेवार ,सोहम झुरमुरे , दिव्यांशू चवडे, वंशिका बावणे ,रिद्धी घुगे , शिवराज पोटबांधे ,तारक इंगळे , ह्रिधान बनसोड,रियांश आंबिलढुके,यहाना चकोले,
आद्या चोपकर,प्रिन्स देशमुख, अथर्व धकाते,निहीत गजभिये, श्रीशा इटनकर,प्राप्ती मेश्राम, मितांशी मोरे, क्रीयांशसेलोकर
नयन नेवारे सोनाक्षी हटवार, सेश्वर्या हटवार,संकेत कांबळे
लक्ष्मी पांडे,यज्ञेश साखरकर, मैथिली देशमुख मनस्वी धकाते,पार्थवी साठवणे, पार्थ पडोळे,रियांश शेंडे
खियांश कुंभारे , प्रिन्स मोहरकर , हिर पटले ,युग साखरकर , जानवी भोंगाडे , शिवाजी वैद्य , अर्णव बनसोड , चार्वीक नांदनावर , नुरवी साठवणे ,अविरा इंदूरकर ,विभास साखरकर , शोर्या बावणउके, स्वरा बावनउके,मानवी साखरकर , आदिश्री प्रसाद , तोशिव साठवणे , वंश मेहर , योषित पडोळे , प्रांजय भुरे , संकल्प भुरे ,संकल्प आंबीलढूके , रिधान साठवणे , वंश कापसे , नॅन्सी कोचे, पूर्वी देशमुख, श्रमण बनकर कार्तिक केंद्रे आयुषी आंबीलढूके,आरुष बडोले, वैष्णवी बावणकर, अद्वैत उके,अविका ढवळे इ. विद्यार्थ्यांनी उत्साहाने यात सहभाग घेतला. अध्यक्षांनी उपस्थित सर्वांना तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच चिमुकल्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी त्यांना बक्षीस देण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन फाजेला शेख यांनी तर आभार प्रदर्शन मृणालिनी ढोमणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता रंजू सार्वे, दीपिका शर्मा,माधुरी मोहतुरे, शितल मेश्राम, रोजिया बनसोड, आशा हटवार,तेजस्विनी समर्थ,मोनिका गोखले,लता मडामे, किरण मंडाले, चंदा निंबार्ते, निकिता पुडके, दीप्ती सहारे,रागिनी मुने,लीना मेश्राम, प्रगती वासनिक, शारदा साखरे, शालिनी जउळकर,हेमंतकुमार फटे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Comment