तिरोडा:- महाप्रज्ञा बौद्ध विहार समिती, तिरोडा च्या वतीने दिनांक 28/7/2026 ला पूज्य भंते भदंत धम्म कीर्ती महाथेरो (महास्थिवीर) यांच्या 42 व्या पुण्यस्मरण दिनाचे अवचित्य साधून त्यांच्या स्मृतींना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी विहार समितीचे अध्यक्ष मा़. महेंद्र बडगे यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलीत करण्यात आली तसेच बौद्ध महासभा समितीचे अध्यक्ष तुकाराम वैद्य गुरुजी यांच्या हस्ते पूज्य भंते भदंत धम्मकिर्ती महास्थिवीर यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करण्यात केले. यावेळी उपस्थित सर्व बौद्ध उपासक /उपासीका यांनी सामूहिक बुध्द वंदना घेण्यात आली व पूज्य भंते भदंत धम्मकीर्ती महाथेरो (महास्थीवीर) यांच्या जीवनावर प्रकाश टाकत संक्षिप्त विचार मांडण्यात आले.
या प्रसंगी महाप्रज्ञा बौद्ध विहार समितीचे सदस्य, व बौद्ध महासभेचे सदस्य, पदाधिकारी, बौद्ध उपासक /उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विहार समिती चे सचिव आयु. प्रवीण चव्हाण यांनी केले…
