राजु फुंडे : प्रतिनिधी सालेकसा :- दरेकसा येथील ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मुकेशभाऊ इनवाते यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहितकारी उपक्रम राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. शासन व प्रशासनाच्या विविध योजना गावातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच आदिवासी समाजातील नागरिक व विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आदी महत्त्वाची कागदपत्रे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना गावात आमंत्रित करून शिबिरांचे आयोजन केले. त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय टळली असून त्यांना गावातच आवश्यक सेवा मिळाल्या.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ते, नाल्या, समाजभवन यांसारख्या विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करून आमदार संजयजी पुराम यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करून घेण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत परिसरातील युवकांना सोबत घेऊन सार्वजनिक ठिकाणे, रस्ते व नाल्यांची स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी नामांकित कंपन्यांना आमंत्रित करून रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. तसेच परिसरातील कोणत्याही नागरिकाला शासकीय, सामाजिक किंवा वैयक्तिक समस्या उद्भवल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात.
सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, स्वच्छता व विकासकामांच्या माध्यमातून मुकेशभाऊ इनवाते यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
