गोंदिया, दि.18 : छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती गुरुवारी असून या निमित्ताने महाराष्ट्रभर पदयात्रा निघणार आहे. गोंदिया जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनातर्फे पदयात्रा काढण्यात येणार आहे.
मनोहर चौक येथे सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मानवंदना देऊन पदयात्रेला सुरुवात होईल. मनोहर चौक ते इंदिरा गांधी स्टेडियम पर्यंत ही पदयात्रा असणार आहे.
या पदयात्रेत मेरा युवा भारत, एनएसएस, स्काऊट गाईडचे स्वयंसेवक व शालेय विद्यार्थी असणार आहेत. या पदयात्रेमध्ये बँड पथक, लेझीम पथक व पथनाट्य असणार आहे. यासंदर्भात आयोजित बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांनी संबंधित विभागांना पदयात्रेचे व्यवस्थापन नीट होण्याबाबतचे निर्देश दिले.
