सालेकसा/गोंदिया :- जंगलातून जाणारे रस्ते हे वन्य प्राण्यांसाठी नेहमीच धोकादायक बनले असतात. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपले वाहन अतिशय सावधपणे चालवणे अपेक्षित असते मात्र तसे होत नाही याचे एक ज्वलंत उदाहरण जमाकुडो ते चांदसूरज रोडवर अज्ञात वाहकाने वाहनाने भरधाव वेगाने एका दोन वर्षीय चितळाला (दि. 10 फेब्रु) रोजी धडक दिल्याने त्याचे जागीच मृत्यू झाले. घटनेची या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी आर के घुटके क्षेत्र सहाय्यक एस यु चव्हाण, वनरक्षक आर जे उईके, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर चौरे पोलीस पाटील व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृत वनप्राण्याला अग्नी दहान देऊन संपवण्यात आले तसेच अज्ञात वाहनाच्या विरोधात वनगुन्हा दाखल करून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी करत आहे.
